जळगाव प्रतिनिधी । यावल ते फैजपूर रस्त्यावरून दुचाकीने घरी जात असताना तरुणाच्या दुचाकीचा रस्ता अडवून त्यांच्या जवळील ३९ हजार ७०० रुपयांची रोकड असलेली बॅग जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलासह दोन संशयित आरोपींना पैजपूर पोलिसांनी यावल शहरातून अटक करण्यात आली आहे.
चेतन गोपाल दरेकर वय-२९,रा. भुसावळ रोड यावल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरूवारी २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मालकीची गाडी क्रमांक (एमएच १९ सीएक्स ३५०) यामध्ये विक्रीसाठी असलेला माल भरून ते डिलिव्हरी करण्यासाठी यावल तालुक्यात निघाले होते. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास चेतन दरेकर हे दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता फैजपूर ते यावल रस्त्यावर त्यांचा रस्ता दोन जणांनी आडवीला व त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरी हिसकावून चोरी करून पसार झाले. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना पोलिसांनी फिर्यादी चेतन दरेकर यांच्यासोबत असलेला साहिल याला चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हे पैसे दानिश पटेल रा. यावल यांच्याकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दानिश पटेल यांच्याकडून ३९ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी फरदीन कबीर पटेल वय 24 रा. आयशा नगर, यावल, सोहेल रुबाब पटेल वय 23 रा. विरार नगर, यावल आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.