चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी असणारे सत्रासेन गावाच्या हद्दीतील फॉरेस्ट नाक्याजवळ गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसासह एका संशयित आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली आहे.
सत्रासेन गावाचा हददीत फॉरेस्ट नाक्याजवळ (चेकपास्ट) जवळ मध्यप्रदेशातून एक संशयित गावठी कट्टा,तीन जिवंत काडतुसासह येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. 23 रोजी 10 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी रोहित दिवाकर वाघमारे (वय 24, रा.माळी चिचोरे, ता.नेवासा, ता. अहमदनगर) याची अधिक चौकशी करत झाडाझडती घेतली त्याच्याजवळून 25 हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटी कटटा (पिस्टल), 3 हजार रुपये किंमटीच्या पिवळ्या धातुचे 3 काडतुस (राउड) तसेच एमएच 17डीए 9191नंबरची दीड लाख किंमतीची रॉयल इंन्फील्ड कंपनीची बुलेट, असा एकूण 1 लाख 79 रुपयाचा हस्तगत करण्यात आला. सदरील इसमा विरुद्ध पो.कॉ. पवन ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ राकेश पाटील हे करीत आहेत.