मुंबई (वृत्तसंस्था) आजकालच्या प्रगत जगात टेक्नॉलॉजीचे जितके फायदे आहेत पण तितकेच वाईट परिणामही आहेत. लहान मुलांना, तरुणांना इतकंच काय तर तरुणींनाही पॉर्न पाहण्याची सवय लागली आहे. पण ही सवय ज्यावेळी वाईट सवयीत बदलते. त्यावेळी मात्र तुम्हाला ती त्यावेळीच थांबवणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही पॉर्न पाहण्याचे व्यसन लागले असेल तर तुम्ही आताच ही सवय सोडा. ही सवय सोडणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही या काही टीप्स नक्की फॉलो करुन पाहा तुमची सवय तुम्हाला वेळीच सोडवता येईल.
तुम्हाला लागले पॉर्न पाहण्याचे व्यसन, व्यसन सोडवण्यासाठी ‘या’ टीप्स करा
सर्वांपासून डिलीट करा पॉर्न
पॉर्नचे सर्व स्त्रोत काढून टाका. पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क किंवा मोबाईल फाईल प्रमाणे सर्वांपासून पॉर्न डिलीट करा. पोर्न वेबसाइटला भेट देऊ नका किंवा त्यांना कायमचं ब्लॉक करा. अँटी पॉर्न सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा जेणेकरून भविष्यात त्याच्याशी संबंधित जाहिराती कधीही तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. यामुळे नक्कीच पॉर्न बघण्यापासून तुम्ही बचाव करू शकाल.
नवनवीन उपक्रमांमध्ये भाग घ्या, पोर्नमधून दूर होईल लक्ष
कोणत्याही सवयीपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नवीन उपक्रमांमध्ये भाग घेणं नवीन गोष्टी शिका जेणेकरून तुम्ही पोर्नच्या आणि पर्यायानं मोबाईलच्या दूर राहू शकाल. हळूहळू तुम्हाला या नवीन उपक्रमांमध्ये इंटरेस्ट वाटू लागेल आणि पोर्नमधून लक्ष दूर होईल.
स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या, त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
पॉर्न बघितल्यामुळे फक्त मनाला आणि बुद्धीलाच नाही तर शरीरालाही नुकसान होतं. त्यामुळे आपल्या प्रकृतीकडे सतत लक्ष द्या. कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सहजतेनं पॉर्न बघण्यापासून दूर होऊ शकाल.
कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांसोबत गप्पा मारा
तुम्ही जितका जास्त वेळ एकटा घालवाल तितका तुम्हाला पुन्हा पॉर्न बघण्याची इच्छा होईल. म्हणून एकटे राहू नका, स्वतःला शक्य तितकं व्यस्त ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांसोबत गप्पा मारा, नवीन लोकांशी मैत्री करा किंवा स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी पॉर्न व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडतं ते करा.