यावल (प्रतिनिधी) कोरपावली येथे गोदावरी फाऊंडेशनच्या विद्यमाने आयोजित भव्य निशुल्क महाआरोग्य शिबीर घेण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यात ज्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली होती. त्यांची गावातून गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकामी रवानगी करण्यात आली.
त्यावेळी रुग्णासोबत माजी सरपंच तसेच काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, भरत चौधरी, अजय बढे नितीन पाटील उपस्थित होते. यावेळी रुग्णांनी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि जलीलदादा पटेल, सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच मुक्तार पटेल, उमेश जावळे आदींचे आभार मानले.