जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गोद्री येथील कुंभमेळ्यासाठी आंध्रप्रदेशातून आलेल्या खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
गोद्री येथे हिंदु गोरबंजारा,लबाना, नायकडा समाजाचा कुंभमेळावा सुरु आहे. येथील कुंभमेळ्यासाठी आंध्रप्रदेशातून आलेल्या खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने कारला धडक दिली. हा अपघात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास फत्तेपुरजवळ घडला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. बस जामनेर येथून फत्तेपुरकडे जात होती. कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस कारवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.