जामनेर (प्रतिनिधी) जळगाव-जामनेर या चालत्या बसमधून अज्ञात चोरट्याने १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या असलेल्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुभाष मांगो पाटील (वय-६९, रा. एकविरा नगर, चोपडा) हे २० फेब्रुवारी रोजी चोपड्याहून जामनेर जात होते. जळगावहून बस निघाल्यानंतर अज्ञात चोरट्याने १ लाख १० हजार रुपये किंमतीच्या असलेल्या चार सोन्याच्या बांगड्या (पाच तोळे वजनाच्या) लंपास केल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.