TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणिताच्या अभ्यासामुळे आकलनाची चौकट वाढते : प्रा. एच. एल. पाटील

बोदवड महाविद्यालयात गणितीय पोस्टर स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) गणिताच्या संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेतल्यास गणित विषय देखील खूप आनंददायी होऊ शकतो.त्यातून आकलनशक्ती वाढून सृजनशीलतेला चालना मिळू शकते.त्यामुळे कोणताही विषय समजायला गणिताची मदत होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गणितात करिअर करावे असे आवाहन .कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा .एच. एल. पाटील यांनी केले.बोदवड कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयात आयोजित गणितीय पोस्टर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सदर गणितीय पोस्टर स्पर्धेचे आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. चेतनकुमार शर्मा होते. गणिताची भीती दूर व्हावी आणि गणिताच्या सहाय्याने मेंदूचा विकास व्हावा या उद्देशाने गणितीय पोस्टर स्पर्धा गणित विभागातर्फे घेण्यात आली. सदर पोस्टर स्पर्धेत गणिताचे दैनंदिन जीवनातील विविध उपयोग, गणितातील विविध मनोरंजक कोडी, बारकोड , क्यूआरकोड ,गमतीजमती तसेच गणिताचा संगीत, वैद्यकीय, शेती, हवामानशास्त्र ,व्यापार क्षेत्रात तसेच उपग्रह प्रक्षेपणसाठी, अर्थशास्त्रामध्ये, शेअर बाजारामध्ये कश्याप्रकारे वापर होतो याविषयांवर पोस्टर विद्यार्थ्यांनी तयार केली होती.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

महाकाय जहाजांचा तोल साधण्यासाठी कोणती गणिते करावी लागतात, भरती ओहोटीचे गणित कसे असते, निवडणूक प्रक्रियांच्या नियोजनात सुसूत्रता आणण्यासाठी गणिताचे तर्क कसे प्रकारे वापरतात, व्यापारामध्ये अर्थशास्त्रामध्ये आयुर्विमा क्षेत्रामध्ये व्यक्तीच्या मृत्यूची संभाव्यता लक्षात घेऊन गणिती प्रारूपे कशी तयार करतात, संगणकशास्त्रातील सर्च इंजिनमध्ये गणिताच्या उपयोग कसा होतो, गणिताची ऑपरेशन रिसर्च शाखा कशी उपयोगी पडते, त्सुनामी याविषयी अंदाज आणि त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी गणिताचा कसा वापर होतो, मोबीअसपट्टीचा वापर वापरून न संपणारी ध्वनीमुद्रका कशी बनवली जाते. विद्यार्थ्यांनी निसर्गात आढणाऱ्या गोल्डन रेशो, गोल्डन रेक्टांगल यांचा गुगल ,पेप्सी,फेसबुक यांसारख्या विविध कंपन्यांचे लोगो तसेच स्थापत्य शास्त्रात डिझाईन बनवण्यासाठीचे होणारे उपयोग गोष्टींवर पोस्टर बनवितांना भर दिला. पोस्टर्स स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक एच. एल. पाटील आणि डॉ.अनिल बारी यांनी केले.

प्रास्ताविकात गणिताचे महत्त्व आणि गणिताविषयी जागृती करणे हा उद्देश पोस्टरस्पर्धेचा असल्याचे विभागप्रमुख डॉ.रुपेश मोरे यांनी नमूद केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपाली चौधरी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राची चौधरी यांनी केले. सदर पोस्टरस्पर्धेला 42 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतः पोस्टर तयार केली होती. यावेळी या पोस्टर प्रदर्शनास वरिष्ठ महाविद्यालयासह कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन संकल्पना समजून घेतल्या. प्रथम वर्ष विज्ञान गटातुन प्रीती हिम्मतसिंग पाटील, प्रीती सुधाकर माळी, रुतुजा दिलीप पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय वर्ष विज्ञान गटातून गायत्री दिलीप चौधरी आणि आरती गणेश धांडे यांनी संयुक्तिकपणे प्रथम क्रमांक पटकावला . चंचल सुपडू बडगुजर व मुक्ता ईश्वर ताठे यांनी संयुक्तिकपणे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले तर पवन नाना पाटील आणि शुभम भगवानसिंग राजपूत यांनी संयुक्तिकपणे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

कार्यक्रमासाठी योगेश व्यवहारे ,रुपाली चौधरी ,प्राध्यापक प्रभाकर महाले,डॉ. वंदना नंदवे, डॉ गीता पाटील,श्री.विशाल जोशी,नरेंद्र जोशी,डॉ.अजय पाटील,सौ.हेमलता कोटेचा ,डॉ.अमर वाघमोडे,शरद पाटील आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक बाबुराव हिवराळे, दीपक जोशी , वैभव माटे,शेखरसिंग चव्हाण,वैभव कासार , योगेश राजपूत , जितेंद्र बडगुजर, विजू धोबी, अतुल पाटील, समीर पाटील, यश बोदडे,गायत्री तळले ,श्रद्धा बोरोले, निकिता मोंढाळकर ,भावना माळी ,साक्षी माळी,वैष्णवी बडगुजर तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवर्गाने व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

गतिमंद बालिकेवर अत्याचार ; आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप सीसीटीव्ही फुटेज ठरला महत्त्वाचा पुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात तीन गावठी कट्टे आणि १० काडतुसासह एकाला अटक !

June 13, 2024

‘खबरदार अमेरिकी फौजांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला तर’ ; जो बायडेन यांचा तालिबान्यांना इशारा

August 21, 2021

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन, पाच, दहा रुपये ; विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला फासले काळे !

November 22, 2023

चाळीसगाव येथे अखिल भारतीय शिंपी समाजाचे २२वे अधिवेशन

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group