TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

vijay waghmare by vijay waghmare
July 9, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेची महासभा गुरुवारी नागरी प्रश्न, प्रशासनाच्या कार्यपद्धती आणि विविध प्रलंबित विषयांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील गाळेधारकांकडे महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी अडकून पडली असून, ती तातडीने वसूल करून शहर विकासासाठी वापरण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेविका वैशाली पाटील यांनी महासभेत केली. यासोबतच महासभेत बीव्हीजी कंपनीच्या कचरा संकलनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, नगरसेवकांच्या तक्रारींची गोपनीयता न राखणाऱ्या अधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली आणि बहुचर्चित ख्वाजामियाँ जागा प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशीचे संकेत मिळाल्याने मनपा वर्तुळात चर्चांना उधाण आले.

महासभेत विविध विषयांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सफाई व्यवस्थेतील शिस्त वाढविण्यासाठी सफाई कामगारांची बायोमेट्रिकद्वारे उपस्थिती नोंदविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांनी डम्पिंग ग्राउंडचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही दिला.

READ ALSO

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

गाळेधारकांच्या प्रश्नासोबतच नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नगरसेवक डायरी’ उपक्रमाच्या अंमलबजावणीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. नगरसेवकांच्या प्रभागात प्रशासनाने केलेल्या कामांची माहिती अधिकाऱ्यांनी स्वतः देऊन नगरसेवकांची नोंद व सही घेण्याची संकल्पना या उपक्रमामागे होती. मात्र, ही डायरी केवळ त्यांच्या प्रभागात एकदाच राबविण्यात आली आणि त्यानंतर हा उपक्रम पूर्णपणे बंद पडल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील इतर कोणत्याही प्रभागात या उपक्रमाची अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला संपूर्ण शहरात ‘नगरसेवक डायरी’ तातडीने पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

‘नगरसेवक डायरी’ कोणाच्या आदेशाने बंद केली?

महासभेत वैशाली पाटील यांनी थेट प्रशासनालाच जाब विचारला. महासभेने मंजूर केलेला पारदर्शकतेचा उपक्रम असलेली ‘नगरसेवक डायरी’ नेमकी कोणाच्या आदेशाने बंद करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच हा उपक्रम तातडीने पूर्ववत सुरू करून नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांची नियमित माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली.

यावेळी त्यांनी गुरू पेट्रोल पंप ते पाचोरा रोड या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आयुक्तांनी तातडीने पाहणीचे आदेश दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

थकीत महसूल वसुलीवर भर

महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे करार अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने मोठ्या प्रमाणावर महसूल अडकून पडला आहे. हा प्रश्न तातडीने निकाली काढून थकीत रक्कम वसूल करावी, जेणेकरून शहराच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल, अशी मागणी वैशाली पाटील यांनी केली.

याशिवाय नगरसेवकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याचा लेखी अहवाल प्रत्येक नगरसेवकाला देण्यात यावा. त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होईल आणि कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, अशी भूमिकाही त्यांनी महासभेत मांडली.

एकूणच नागरी सुविधा, महसूल वसुली, स्वच्छता व्यवस्था, प्रशासकीय पारदर्शकता आणि प्रलंबित विकासकामांवरून झालेल्या जोरदार चर्चेमुळे जळगाव महानगरपालिकेची ही महासभा चांगलीच गाजली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचा आज समारोप

December 29, 2021

शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

November 5, 2020

विवाहितेचा २५ लाखासाठी छळ ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

January 27, 2022

मध्य रेल्वे भुसावळ डिव्हिजनमधील ८ पोलीस निरीक्षकांची बदली !

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group