TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – खान्देशाचे प्रवेशद्वार असलेल्या चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित या जलयात्रेचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर मंदिर व चौंडी येथून झाला होता.

जलयात्रा चाळीसगावमध्ये दाखल होताच कन्नड घाट पायथ्याशी दस्तुरी फाटा येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वागत सोहळा पार पडला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार रामरावजी वडकूते, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर तसेच संत-महंत व हजारो जलयात्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. दस्तुरी फाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

READ ALSO

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

यानंतर जलयात्रेचे शहरात नागद रोड चौफुली मार्गे आगमन झाले. पाटणादेवी रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पुढे घाट रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जलयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने जलयात्रींसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. जाहीर सभेत धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचा पारंपरिक धनगरी घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला.

सभेत बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रामरावजी वडकूते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पाण्याच्या शाश्वत वापराबाबत जागृती करण्यासाठी या जलयात्रेचे महत्त्व अधोरेखित केले. “वारसा, विचार आणि विकास” या संकल्पनेवर आधारित ही जलयात्रा समाजमनात पाण्याबाबत जागृती निर्माण करणारी व्यापक चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या “प्रजा हीच दैवत” या विचारातून सुशासनाची दिशा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, निवडणुकांशिवाय केवळ जलजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली ही जलयात्रा कौतुकास्पद असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पासाठी महत्त्वपूर्ण आहे. केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर जळगाव जिल्हा व चाळीसगाव मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विविध प्रलंबित प्रकल्प पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नारपार प्रकल्पाचे काम सुरू झाले असून वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पामुळे सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या जलयात्रेत काशी विश्वनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती, १३० नद्यांचे पाणी असलेला जलकलश आणि अहिल्यादेवी होळकर यांची भव्य प्रतिमा असलेले रथ विशेष आकर्षण ठरले. नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम जल्लोषात पार पडला.

या उपक्रमातून “पाणी वाचवा, पाणी साठवा” हा संदेश देत जलसंवर्धन, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा ठाम प्रयत्न करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज २३७ रुग्णांची कोरोनावर मात ; १२७ नवीन बाधित !

October 23, 2020

धक्कादायक : बारामतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : एजंट महिलेला अटक !

November 21, 2021

अविनाश भोसले यांच्याविषयी कोर्टानं दिला मोठा निर्णय ; भोसलेंना ३० मे पर्यंत नजरकैद

May 27, 2022

अभिनेता सोनू सूदची कोरोनावर यशस्वी मात

April 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group