मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,००० रुपये आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,००० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,०४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,००० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६११ रुपये आहे.