मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४९,८५० आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स ०.५४ टक्क्यांनी घसरून २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,६२० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहेत.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५४,३८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,८८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,४६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,८८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,४६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०० रुपये आहे.
सोन्या-चांदीचे ताजे दर
आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स ०.५९ टक्क्यांनी किंवा ७१० रुपयांनी घसरून २२ कॅरेट सोन्याचे दर ४९,१५० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर,१ किलो चांदीचा दर ६९,३०० रूपयांवर व्यवहार करत आहे.
जागतिक बाजारपेठेतील दर
स्पॉट गोल्ड ०.३ टक्क्यांनी घसरून $१,९४४.७७ प्रति औंस, ०२०६ GMT नुसार, यूएस सोन्याचे फ्युचर्स ०.६ टक्क्यांनी घसरून $१,९४७.७० वर आले.