मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत आज पुन्हा घसरण झाली असून १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,५०० रुपये झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,६४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,६५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,५०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे.