मुंबई (वृत्तसंस्था) कमाॅडिटी आणि सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींवर दबाव आहे. चांदीमध्ये मात्र गुंतवणुकीचा ओघ सुरु आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७७६८ रुपये इतका खाली आला. एक किलो चांदीचा भाव ६१६१८ रुपये इतका आहे. चांदीमध्ये २६० रुपयांची वाढ झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार आज सराफा बाजारात सोन्याचा भाव ४७९६२ रुपये इतका आहे. त्यात १२५ रुपये इतकी घसरण झाली. कमाॅडिटी बाजारात चांदी तेजीत असली तरी सराफा बाजारात मात्र त्यात घसरण झाली आहे. चांदीचा भाव ६१४७७ रुपये असून त्यात ३३९ रुपयांची घसरण झाली आहे.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४९०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४८९८० रुपये इतका आहे. दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४९०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४८९९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५१४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२४० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४९०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९९० रुपये इतका आहे.