नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 52 हजार 470 रुपयांवर पोहचला आहे.
सरकारने भारतीयांचे सुवर्णप्रेम कमी करण्यासाठी सोन्याच्या आयतीवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. सोन्यावर 5 टक्के आयात शुल्क लावले आहे. सोन्यावर यापूर्वी 7.5 टक्के आयात शुल्क होते. आता त्यात वाढ होऊन ते 12.5 टक्के होणार आहे. या घडामोडींचा परिणाम बाजारात दिसून आला. सोन्याच्या भावाने उसळी घेतली MCX वर सोन्याचा वायदे भाव 248 रुपयांनी वाढून 52,470 वर पोहचला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. चांदीचे दर 373 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 58,861 रुपये झाले आहेत. दरम्यान, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून 3,789 रुपये प्रतितोळा स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव प्रतितोळा 56,200 रुपये इतका झाला होता. दरम्यान, ibjarates.com नुसार, 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. हे सोने प्रति 10 ग्रॅम 51,467 रुपये दर आहे. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भाव कमी झाला आहे. गेल्यावेळी एक किलो चांदीचा भाव 65,825 रुपये होतो, तो आज 66,468 रुपये प्रति किलो आहे.