मुंबई (वृत्तसंस्था) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा (Monsoon) पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाची ही टक्केवारी म्हणजेच यंदा चांगला पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पावसाची ही वार्ता शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. सरासरीच्या ९९ टक्के पाऊस म्हणजे २०२० पर्यंत गेल्या पन्नास वर्षांपर्यंतचं पाऊसमान काढलं तर ते साधारण ८६८ मीमीटर इतकं आहे. याच्या सरासरी ९९ टक्के म्हणजे हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो. त्यामुळं यंदाचा पाऊस चांगला असेल असं सांगितलं जात आहे.
वर्षभरात जो पाऊस पडतो त्यांपैकी ७४ टक्के पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यात पडतो. त्यामुळं हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला मानला जातो. त्यामुळं हे चार महिने फक्त शेतकऱ्यांसाठी तर भारतीयांसाठी चांगले मानले जातात. सध्या जर चांगला पाऊस राहिला तर सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येऊ शकते म्हणून तो दिलासादायक ठरेल असं मानलं जात आहे.
















