मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात लवकरच पोलीस भरतीची ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळते. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईत बीडीडी चाळमधील पोलीस वसाहतीत पोलिसांना ५० लाखांत घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पोलीस कॉन्स्टेबलपदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.