मुंबई प्रतिनिधी । राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात २०,५९८ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात २०,५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १२,०८,६४२ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण २,९१,२३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज २६,४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ८,८४,३४१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ७३.१७ % एवढं झालं आहे.
राज्यात आज ४५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद केली गेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५८,७२,२४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,०८,६४२ (२०.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,४९,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.