TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात !

व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास मोलाचा असतो : नितीन देवरे !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2022
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ उत्साहात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा, देशाच्या समस्या, लोकनृत्य इ. विविधरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगावचे तहसिलदार नितीन देवरे तर प्रमुख अतिथी म्हणून पी.आर.हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच आलेल्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. शिक्षिका भारती तिवारी यांनी आपल्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरवात अतिशय मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर लक्ष्मणराव पाटील यांनी आलेल्या अतिथी मान्यवरांचा परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व अतिथींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व स्टाफ ने अतिशय परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे तोंडभरून कौतुक केले. शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे भ्रमणध्वनी द्वारे सदिच्छा कळवल्या.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे सरांनी सांगितले की, शाळेचा आवाका लहान असला तरी इथे कार्य करणारे सर्वच मनाने खूप मोठे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनकुमार देवरे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. “व्यक्तिमत्त्व विकासात सांस्कृतिक विकास अतिशय मोलाचा असतो”, असे प्रतिपादन तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी व्यक्त केले. औपचारिक उदघाटन समारंभ आटोपल्यावर सर्व मान्यवरांनी समोर बसून कार्यक्रमाला मनापासून दाद दिली.
ज्या कार्यक्रमाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते त्या कार्यक्रमाला सुरवात झाली. वेलकम डान्स, पापा मेरे पापा, हर हर शंभू, बुम बुम डान्स, मिक्स लावणी, गोवा सॉंग, माय भवानी, शोले डान्स, कोरोना थीम डान्स, वाया वाया डान्स, पथनाट्य, कदम कदम मिलाये, ऐगिरी नंदिनी, ड्रामा, ओल्ड रिमिक्स, इमोशनल थीम, मेरी माँ के बराबर…, मराठी रिमिक्स, नैनोवाले ने जादू डाला, कोरोना थीम परफॉर्मन्स, लेझी डान्स, मिरची लावणी मॅशप, डान्स का भूत, पिरॅमिड आणि शेवटी ऑल टीचर्स डान्स अशा एकूण २५ कार्यक्रमांनी आपल्या बहारदार परफॉर्मन्स च्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकून घेतली. नर्सरी च्या चिमुकल्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थांपर्यंत सर्वांनीच एकापेक्षा एक सादरीकरण करून भारतीय संस्कृती आणि परंपरा, देशभक्ती, कोरोना, देशाच्या समस्या, लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, पारंपरिक नृत्य, लावणी, आई – वडिलांचे प्रेम, साऊथ इंडियन यांचे दर्शन घडवले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी पूर्वा जाला, श्रेया भावे, करिष्मा जावरे, मनस्वी पाटील, मनस्वी पवार, नेहा राजपूत, कृपा पांडे, प्रांजल शिंदे आणि नववीचे विद्यार्थी कुणाल चव्हाण, झेद खाटीक यांनी केले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सेट करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून म.प्र.काँ.चे माजी प्रदेश सचिव डी.जी.पाटील, अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, गुरुकुल स्कुलच्या प्राचार्या वैशाली पवार, माजी सभापती दिपक सोनवणे, कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, समाजकल्याण विभागाचे समीर भाटीया, सिंधू गार्डन चे संचालक साहेबराव महाजन, अमोल रेसिडेंसी चे संचालक रविंद्र हरपे, शा.भ्र.नि.स.जळगाव जिल्हा अशासकीय सदस्य रविंद्र कंखरे, पवार पेट्रोलियम चे संचालक चंदन पाटील, पत्रकार भगीरथ माळी, धर्मराज मोरे, पी.डी.पाटील सर, अविनाश बाविस्कर, मंगेश पाटील, विकास पाटील तसेच मोरे सर, असलम भाई, निजाम भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला होमगार्ड पथक, आनंद टेंट हाऊस, डीजे गोलू, वास्तव डिजिटल, महाजन फोटो स्टुडिओ यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल श्रीमावळे, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी तर अतिशय गोड शब्दात आभार प्रदर्शन सपना पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

कोथळी येथील अम्युजमेंट पार्कला एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने 4 कोटी रुपये निधी मंजुर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद !

June 5, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 एप्रिल 2024 !

April 8, 2024

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

January 13, 2021

कचरा गोळा करण्याचे काम करुन तू समाजात आपली इज्जत घालवतोय…म्हणत तरुणाचा खून !

July 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group