नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ज्यावेळी खास दिवस असतो. त्यावेळी गुगल डूडल बनवते. खास डूडल साकारून गुगल लोकांना याची माहिती देतो. गुगलने आज एक जबरदस्त डूडल साकारले आहे. आज २० मार्चपासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतू सुरु झाला आहे. वसंत ऋतू २१ जूनपर्यंत कायम असतो. हा काळ फुलांचा हंगाम म्हणूनही ओळखला जातो. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुगलने भन्नाट रंगीबेरंगी डूडल साकारलं आहे.
वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी गुगलने खास डूडल साकारले आहे. यात निळ्या, हिरव्या, लाल, नारंगी, पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या नैसर्गिक प्रकृतिशी जोडले आहे. यात रंगीबेरंगी फुल आहे. तसेच यात जंगली उंदीर सुद्धा दाखवले आहे. यावर फुलांचा एक गुलदस्ता दिसत आहे. याच वसंत ऋतूतील भावना गुगलच्या या डूडल द्वारे प्रकट होत आहेत. तुम्हाला वसंत ऋतू तीन मधमाशा उडताना दिसत आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वसंत ऋतूच्या संबंधी सविस्तर माहिती व लेख मिळतो. तसेच यात २० मार्च म्हणजेच आजपासून वसंत ऋतू सुरू होऊन २१ जून पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येते. वसंत ऋतूचा हवामान थंड हवेत आणि गरमी मध्ये येते. या दरम्यान जास्त गरमी होती न जास्त गरमी. वसंतू ऋतू मध्ये फुल बहरतात. प्रत्येक ठिकाणी फुले खुलून दिसतात. यादरम्यान, दिवस रात्रची वेळ बरोबर असते. वसंत चे हवामान आधी Spring Equinox च्या नावाने ओळखले जाते. ज्यावेळी सूर्य दक्षिणी कडून उत्तर गोलार्ध मध्ये जात असते. Equinox मध्ये दिवस आणि रात्र जवळपास १२ तासांची वेळ लागते.
गुगल रोज काय डूडल देईल, कुण्या व्यक्तिला मानवंदना देईल याची उत्सुकता रोज लागून असते. प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस, पुण्यस्मरण, एखादा सण गुगलकडून सुंदर डूडल साकारुन सेलिब्रेट केला जातो.