TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात राज्यपालाचा सर्वपक्षीय निषेध, जोडे मारून राज्यपालांचा पुतळा जाळला !

भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची उपस्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व अखंड भारताचे महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचेविषयी वादग्रस्त व ऐकेरी उल्लेख केल्याने संपुर्ण देशात व राज्यात शिवप्रेमी जनतेत तीव्र संतापाची लाट तयार झाली असुन त्यांचा जागोजागी निषेध व्यक्त केला जात आहे. जामनेर शहरातही शिवप्रेमी बांधवानी निषेध सभा व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना उपस्थितीचे आवाहन केले होते. यावेळी भारतीय जनता पक्ष वगळता राष्ट्रवादी, प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, शिवसेना, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आदींनी आपली उपस्थिती दिली.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

राजमाता जिजाऊ चौक, नगर परिषद समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करुन भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करुन राज्यांच्या जबाबदार व्यक्तीकडून अश्या प्रकारे विधान व्यक्त असेल तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही तसेच कोण छत्रपती शिवरायांचे गुरू राजमाता जिजाऊ असुन रामदास स्वामी व शिवाजी महाराज यांचा कोणताही संबंध नसून समकालीन इतिहासात त्याची कोणतीही भेट झाली नसून तसा पुरावा ही नाही, तर यावर उच्च न्यायालयाने ही समर्थ रामदास गुरु नव्हते असा निकाल दिलेला असताना राज्यपाल सारख्या व्यक्तिने असले विधान करणे चुकीचे असल्याचे उपस्थीत शिवप्रेमी यांनी निषेध व्यक्त करतांना आपल्या भावना व्यक्त केल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करुन राज्यपाल यांनी आपली संस्कृती ही दाखवून दिली असा संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय गरुड, डॉ. प्रशांत पाटील, पप्पू पाटील, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके, विधानसभा क्षेत्रप्रमुख मनोज महाले, शेतकरी आघाडीचे अण्णा पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू खरे, शिवसेनेचे अतुल सोनवणे, भरत पवार, संभाजी ब्रिगेड चे राम अपार , मराठा सेवा संघाचे योगेश पाटील, सुनील कानडजे, विनोद पाटिल, जावेद मुल्लाजी, सईद मुजावर, मोहन चौधरी, संतोष झालटे, उत्तम पाटील, सचिन बोरसे, आईफज शेख, खालिद साहेब, इम्रान भाई, अनिस पहेलवान, अजमल राठोड, कैलास अपार, माधव चव्हाण, वैभव बोरसे, डॉ. बाजीराव पाटील, प्रल्हाद बोरसे, निलेश गायकवाड , रामा मगरे, विजय तायडे, दिलीप मराठे, अविनाश पाटील, सचिन बोरसे, दिपक राजपूत( गब्बर ), दिपक खाटीक, आकाश खाटीक, गोलू खाटीक, गोपाल बरकले, उदय बुंदले, भुशन बुंदले, निखिल परदेशी, शुभम चौधरी, प्रशांत साबळे, पवन सोनवणे, केतन सोनवणे , मनोज बोरसे, विलास वराळे, विकास सोनवणे, राम खाटीक, आनंद सोनवणे, संदीप पाटील, हरी मराठे, राहुल भुलाने, भूषण धनगर, गोलू बोरसे, आकाश बंडे, अविनाश बोरसे , आकाश पाटील आदी उपस्थीत होते.

निषेध आंदोलनाला भाजपाची अनुपस्थिती

निषेध आंदोलनाला भाजपाची अनुपस्थिती सर्व शिवप्रेमी बांधव यांना खटकली शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा देखावा करणारी भाजप जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल यांचा साधा निषेध करू शकत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा ते महत्वाचे आहे, हेचं यातून सिद्ध होते. विशेष म्हणजे निषेधाचा कार्यक्रम सर्वपक्षीय बॅनर खाली आयोजित होता व भाजपने उपस्थीत राहावे असे आवाहन केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

जळगाव : तरुणीचा अश्लील व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावले उचला ; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना

December 22, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १५ जुलै २०२३ !

July 15, 2023

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

June 24, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group