धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई होत नसल्यामुळे थेट सरपंच व सदस्य यांनीच अड्ड्यावर धाड टाकत दारूच्या पोथऱ्या जप्त केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रचंड प्रमाणात अवैध दारू संदर्भात त्रास सहन करावा लागत होता. याठिकाणी तरुण मंडळी व्यसनाधीन होऊन गेल्या सहा महिन्यात अवैध दारूमुळे मृत पावलेले आहेत. प्रशासनाला वारंवार पद्धतीने निवेदन दिले असून तरी देखील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज स्वतः सरपंच स्वप्नील महाजन व ग्रामपंचायत सदस्य हरी महाजन, मिलिंद पाटील, सुरेश पाटील यांनी अवैध दारू जप्त केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.