धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या लसीकरण कार्यक्रम आज श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्यावतीने कोरोना लसीकरण शिबिर बालाजी मंदिरात घेण्यात आले. या शिबिराचे शुभारंभ पुजा श्याम भाटीया या महिलेला प्रथम लसीकरण डोस देवुन करण्यात आले. तसेच मंडळाने आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
या प्रसंगी बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील व उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, कार्याध्यक्ष जिवन आप्पा बयस, हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेले डॉ. मयुर जैन, उमेश येवले, आर के देशमुख, निलेश वाणी, पुनीत चौधरी, दीपा मोरावकर सिस्टर याचां श्रीफळ देवुन मंडळाचे संचालक चंद्रकांत अमृतकर, प्रशांत केले, महेंद्र बयस यांनी सत्कार केला. या शिबिरास सहसचिव प्रशांत वाणी व मंडळाचे सदस्य, प्रमोद जगताप, किशोर वाणी, गणेश राजपूत व अरुण महाले, शाम भाटिया, पुनीत चौधरी यांनी परीश्रम घेतले.
या वेळी मंडळाने आवाहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन, परिसरात लसीकरण जवळच झाले म्हणून नागरिक व वृद्ध यांनी मंडळाला धन्यवाद दिले आहेत. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे सहकार्य व मदत केली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी आर पाटील व उपाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी आभार मानले.