जळगाव (प्रतिनिधी) थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी आदींसह इतर उपस्थित होते.
















