नशिराबाद (प्रतिनिधी) येथील नगर परीषद समोरील धोबी वाड्यात आज राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांची ६५ पुण्यतिथी नशिराबाद परीट समाज व तरुण दुर्गा उत्सव मित्र मंडळ यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
यावेळी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गाडगेबाबा यांच्या विषयी विजय बारबुदे यांनी माहिती दिली. यावेळी सुदाम धोबी, युवराज धोबी, रमण भावसार, मधुकर कोळी, बालू वाणी, प्रकाश चौधरी, अनिल चौधरी, सुनील साळी, अर्जुन कोळी, सुदाम कोळी, दिलीप भावसार, रमेश चव्हाण, किशोर चव्हाण, राहुल धोबी, राहुल चव्हाण, विवेक धोबी, आकाश धोबी आदी उपस्थित होते.
















