नशिराबाद (सुनिल महाजन) येथील नगर परीषद समोरील धोबी वाड्यात आज राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या १४६ जयंतीनिमित्त नशिराबाद परीट समाज व तरुण दुर्गा उत्सव मित्र मंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी बाबा च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच गावातील टाळकरी वारकरी मंडळ प्रभाकर महाराज नारखेडे, सुदाम धोबी युवराज धोबी, कैलास व्यवहारे, निलेश धोबी, मधुकर कोळी, अमोल धोबी, भूषण चौधरी, प्रकाश चौधरी, मुकुंदा देशपांडे, लक्ष्मीकांत सपकाळे, अलोक देशपांडे, मंगल चौधरी, सुदाम कोळी, फकिरा कोळी, राहुल धोबी, विवेक धोबी, आकाश धोबी आदी उपस्थित होते.