धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रतिमापूजन व माल्यार्पण ज्येष्ठ नागरिक धृवसिंह बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर, वाचनालयाचे सचिव योगेश पी.पाटील,विश्वास भाटिया,नंदू पाटील, प्रल्हाद महाले,उमेश चौधरी,आबा चौधरी,उमेश जाधव,अशोक सैंदाणे,दिपक गायकवाड,रघुनंदन वाघ आदी उपस्थित होते.