चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसैनिकांचे दैवत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे शिवसैनिक तसेच बाळासाहेब प्रेमी, नागरिक, व्यापारी डॉक्टर्स यांच्या वतीने दीप लावून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे अमर रहे परत या परत या बाळासाहेब परत या अशा घोषणा दिल्या. तसेच बाळासाहेबां बद्दल आदर व्यक्त केला सदर प्रसंगी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील राजपूत, दैनिक ग्रामस्थांचे संपादक किसनराव जोर्वेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ, उद्योगपती वर्धमान धाडीवाल, शिवसेना तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आरडी चौधरी, सचिव एम. पी. पाटील, एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, प्रभाकर उगले, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, जगदीश महाजन, युवा सेनेचे रवी चौधरी, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सविता कुमावत, वसीम चेअरमन नकुल पाटील, दिनेश घोरपडे, निलेश गायके, आप्पा देवरे, साहेबराव काळे, अल्ताफ शेख, सोनू कुमावत, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास भोई, बापू लेणेकर, चेतन भोई, मिलिंद देवरे, रॉकी धामणे, अरुण पाटील, पिंटू सपकाळ, आदेश शिवसैनिक तसेच शहरातील व्यापारी बांधव प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.