नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन झालं आहे. दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा मृत्यू झाला होता.
तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास ४५ टक्के भाजले होते त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते. यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचं निधन झालं.