जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या जीएसटी घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित पिंटू इटकरेला नाशिक रोड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आठवड्यातून दोन वेळेस हजेरी आणि ३० हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, इटकरेला आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. इटकरेकडून अॅड. गिरीश भुमरे यांनी कामकाज पहिले.
डीजीजीआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी ब्रिज भूषण त्रिपाठी यांच्या पथकाने बुधवारी धाड टाकली होती. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले होते. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. डीजीजीआयच्या पथकाने बुधवारी जळगावमधून पिंटू इटकरेला घेतले होते.भारुडे आणि इटकरे हे दोघं नात्याने शालक-मेहुणे आहेत. शुक्रवारी पिंटू इटकरेला सायंकाळी नाशिक कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज इटकरेने आज जामीन अर्ज दाखल केला. इटकरेचे वकील अॅड. गिरीश घुमरे यांनी न्यायलयात युक्तिवाद करताना सांगितले की, इटकरे सुरेशचंद्र जधवानीकडे नौकरीला होता. नौकरीच्या निमित्ताने जधवानी, सचदेव आणि सीए वालेचा यांनी कागदपत्र गोळा करून फर्म उघडल्या आणि इटकरेला फसविले. तसेच या सर्व प्रकरणात अंधारात ठेवत इटकरेला गोवण्यात आल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर आठवड्यातून दोन वेळेस हजेरी आणि ३० हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर इटकरेला न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधाराची जळगावात फायनान्स कंपनी आहे.