धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे फुलपाट येथील भोई समाजाच्या भगिनीच्या मुलाच्या डोळ्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे.
एकेदिवशी एक भगिनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे आपल्या लहान मुलांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी आर्थिक मदत मागण्यासाठी आल्या होत्या. ना.गुलाबरावजी पाटील यांनी भाऊबीजची अनोखी भेट महिला भगिनीला देत भाऊबीजचे पावित्र्य जपले होते. यानंतर आपल्या लहान बाळाचे ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी ती भगिनी आलेली होती. यावेळी पालकमंत्री साहेबांनी ‘ताई मी तुझ्या पाठीशी आहे’, आणखी काही मदत लागली तर चिंता करू नको बरं, असे आश्वासित केले. यावेळी सोबत प्रशांत झंवर, किशोर राघो पाटील, चेतन पाटील,गोकुळ नाना, बंडू दादा नारखेडे व मान्यवर उपस्थित होते.