धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचपुरा येथे आज धरणगावातील तरुण कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
तालुक्यातील चिंचपुरा येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विजय महाजन यांच्या नेतृत्वात शहरासह मोठा माळीवाडा परिसरातील कांतीलाल महाजन, किशोर महाजन, विक्रम चौधरी, अमोल महाले, शुभम भावसार, अजय मैराळे यांचा समावेश होता. लवकरच मोठा माळीवाडा परिसरात शिवसेनेची शाखा प्रवेश घेतलेली तरुणाई उघडणार आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, गोपाल चौधरी, पी.एम.पाटील, गजानन पाटील, मुकुंद नन्नवरे, संजय पाटील सर, मोतीअप्पा प-पाटील, गोकुळ नाना पाटील, भानुदास विसावे, विलास महाजन, वाल्मीक पाटील, पवन महाजन, बुट्या पाटील, भैय्याभाऊ महाजन, हेमंत चौधरी, प्रशांत देशमुख, विनायक महाजन, हेमचंद्र चौधरी यासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.