धरणगाव (प्रतिनिधी) येथील राजस ग्राफिक्स आणि एंटरटेनमेंट रेकॉर्डिंग स्टुडिओला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी ना. पाटील म्हणाले की, मला ही गाण्याची खूप आवड आहे. या क्षेत्राला आता खूप महत्त्व आले आहे. कोरोना आजरामुळे घरी युट्यूबचा वापर खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे लोक ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त बघत आहेत आणि आपले खान्देशी गाण्यांनी थेट बॉलीवुड किंवा मराठी गाण्यांना टक्कर देत आहे. त्यात डीजे गोलूचे गाणे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात खूप काही तुम्ही करू शकता.
यावेळी धरणगावचे नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी, कॉन्ट्रॅक्टर मोहन महाजन, नगरसेवक विलास महाजन व जनकल्याण नागरी पथसंस्थेचे संचालक राजेंद्र पाटील उपस्थित होते.