जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून १० किलोमीटर लांब असलेल्या शिरसोली येथे गुलाबराव देवकर महाविद्यालय परिसरात गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकिय व आयुष रूग्णालयाचे कोवीड केअर सेंटरला आजपासून (दि.५ ऑक्टोबर ) जिल्हावासियांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अत्याधुनिक सुविधा व शासकीय दरानुसार उपचार कोविड केअर सेंटर सोमवार ५ ऑक्टोबर पासून रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक वातानुकुलीत १८ बेडचा आयसीयू विभाग, ४० बेड ऑक्सीजन व्यवस्था असलेले जनरल वार्ड, व्हेंटीलेटरची व्यवस्था, २४ तास तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, प्रशिक्षीत व अनुभव कर्मचारी वर्ग, ५ वातानुकुलीत स्पेशल रूम, बायपॅप एनआयव्ही सुविधा उपलब्ध, सुसज्ज, स्वच्द व निसर्गरम्य वातावरण, रोज ध्यान व योग, रूग्णांसाठी दररोज पौष्टीक नास्ता व जेवणाची सोय, पिण्यासाठी गरम व थंड मिनरल पाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रूग्णांच्या चांगल्या सेवेसाठी डॉ. पंकज महाजन, डॉ. चेतन चौधरी, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. नितीन पाटील ही टीम उपलब्ध राहणार आहे.