पाळधी बु ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उद्या दि. २५ मार्च २०२१ पासून पाळधी बु येथे कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
कोविड लसीकरणाला सुरुवात होणार असून सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही लस फक्त गावातली जेष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. ही लस मराठी मुलाची जिल्हा परिषद शाळा पाळधी बु येथे देण्यात येणार असून लसीकरणासाठी नागरिकांनी सोबत आधार कार्ड आणावे, नागरिकांनी सहकार्य करावे, जास्त गर्दी न करता सोशल डिस्टन ठेवावे, असे आव्हान करण्यात आले आहे.