TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव पाटलांनी विधानसभेत सांगितला धरणगावच्या पी.एम.पाटील यांच्या नाराजीचा किस्सा !

जाणून घ्या...नेमका काय होता 'तो' नाराजीचा विषय !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एकाचवेळी ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. त्यामुळे त्यांची नाराजी समजून घ्यायला पाहिजे होती. आमच्याकडे नितीन गडकरी साहेबांच्या कार्यक्रमाच्या वेळी उपजिल्हाप्रमुख भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती कळाली. रात्रभर त्यांची समजूत काढली, नाराजी दूर केली, असा किस्सा शिवसेना बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत सांगितला. दरम्यान, हे उपजिल्हाप्रमुख धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांच्या बाबतीतला होता. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.

 

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

असा होता पी. एम. पाटील यांच्या नाराजीचा किस्सा !


एकाचवेळी ४० आमदार फुटतात, या मुद्द्याला धरून गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत जळगावचा एक किस्सा सांगितला. नितीन गडकरी साहेबांच्या कार्यक्रमाच्या वेळी उपजिल्हाप्रमुख भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती कळाली. रात्रभर त्यांची समजूत काढली, नाराजी दूर केली. यावरूनच तो उपजिल्हाप्रमुख कोण? अशी चर्चा सुरु झाली होती. धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील हे स्थानिक गटबाजीमुळे नाराज होते. अगदी त्यांनी आपल्या उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांना देखील टाकून दिला होता. ही गोष्ट गुलाबराव पाटील यांनी कळताच त्यांनी स्वत: त्यांची समजूत काढली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना पी. एम. पाटील यांना भेटायला पाठवले. पी. एम. पाटील यांची नाराजी समजूत घेत, ती दुर केली होती. यानंतर पी. एम. पाटील यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचा सांगायचा मुद्दा एवढाच होता की, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला जपतो आणि दुसरीकडे आमदारांची नाराजी ऐकून घ्यायला वेळ रहात नाही, यातच बंडाचे मूळ लपलेले आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा मतदार संघात परत जाऊ त्यावेळी जनता आमचे स्वागतच करेल, असेही श्री. पाटील म्हणाले.

 

ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात


चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेले. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा. याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवे होते. ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात, असा प्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. मी आणि काही आमदारांनी सांगितले की, शिंदे साहेबांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांची नाराजी समजून घ्या. पण उलट आम्हाला सांगितले जाते की, तुम्हालाही त्यांच्या सोबत जायचे असेल तर जा.

 

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसैनिक असो की, पदाधिकारी आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो आणि दुसरीकडे काही जण आम्हाला सांगतात तुम्हाला पक्ष सोडून जायचे असेल तर तुम्ही पण जाऊ शकतात. एकाचवेळी एकाचवेळी ४० आमदार फुटतात, त्यांना विचारायला नको. त्यांची नाराजी जाणून घ्यायला नको?, असा सवाल यांनी श्री. पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही बंड नाही तर उठाव केला. आम्ही शिवसेना सोडली नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

 

मी नाराज होतो. पंरतू माझी नाराजी जशी भाऊंना कळाली, तसाच त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला. माझे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. माझ्या भावना समजून घेतल्या. खरं म्हणजे तेव्हा मला मोठं कौतुक वाटलं. राज्याचे कॅबिनेट मंत्री असून सुद्धा आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी गुलाबभाऊ एवढी काळजी घेताय. म्हणूनच भाऊंच्या निर्णयाचं मी सर्वात आधी स्वागत केलं. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याचा किस्सा थेट विधानसभेत सांगितल्यामुळे मी भारावून गेलोय.

– पी.एम.पाटील (माजी नगराध्यक्ष धरणगाव, तथा उपजिल्हाप्रमुख, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
Next Post

"हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका" - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंवरखेडे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

July 22, 2024

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी

February 17, 2022

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

September 19, 2021

‘जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता त्याचं पितळ उघड पडलंय’ : संजय राऊत

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group