पिंप्री खुर्द ता. धरणगांव (संतोष पांडे) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मंगलअण्णा पाटील यांच्या पॅनलचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले आहेत. यानिमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम राहीले. नुकतेच सर्व विजयी सदस्यांचा राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना . गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे.
निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यापैकी बहुसंख्य सभासद गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मंगलआण्णा पाटील यांच्यासोबत येऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री ना . गुलाबरावजी पाटील यांचा पाळधी येथील कार्यालयात जावून सदिच्छ भेट घेतली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचीत सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत-सत्कार केला. यावेळी शिवा महाजन , ईश्वर धोबी , घनश्याम चौधरी , निलेश शर्मा , गणेश चौधरी , देवानंद पाटील सुनिल बडगुजर , संतोष पांडे , आबा धोबी, सिराज खाटीक , शांताराम मोहकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
















