जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बोरद आऊट पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा पान मसाला व्यापाऱ्यासह गुटखा जप्त केला. यावेळी १ लाख १८ हजार ८०० किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, एका व्यापाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. पपिल बाबूलाल जैन (वय ३०, रा.म्हसावद, ता.शहादा) हे कारमधून (एमएच ३९, एबी.७३३७) म्हसावद कडे जात असताना गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी त्यांची कार बोरद येथील शहादा चौफुलीजवळ अडवून तपासणी केली. यात १ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे तसेच १,१२,२०० रुपये किमतीचे त्याचबरोबर १३,२०० रुपये जप्त करण्यात आले.
तसेच १९,८०० रुपये किमतीचे ३ सफेद रंगाच्या छोट्या गोण्या तसेच गोणीत ४ प्लास्टिकचे कट्टे असे एकूण १२ कट्टे व प्रत्येक कट्ट्यात ५० व्ही १ नावाचे तंबाखूचे प्लास्टिकचे पाऊच ६०० प्रत्येक पाऊच याप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस नाईक विजय गोपाल विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पपिल बाबूलाल जैन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.