जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून कानसवाडेमधील तरुणांसाठी व्यायामशाळा तयार झाली आहे.
नुकतीच राज्य शासनाने १७ हजार पदांसाठी पोलिस भरती जाहीर केली आहे. तरुणांनी शारिरीकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी शासनाकडे व्यायामशाळेचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्य झाला असून कानसवाडे येथे व्यायामशाळा तयार झाली आहे. या व्यायामशाळेची पाहणी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी गुरूवारी भेट दिली. यावेळी गावातील जितेंद्र कोळी, सागर कोळी, युवराज कोळी, चेतन कोळी यांच्यासह तरुण हजर होते.