TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे कायम गट विकास अधिकारी आणि मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात रिक्त ठिकाणी ग्रामसेवकांची नियुक्ती करा !

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे रोहिणी खडसे यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2024
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बोदवड येथे कायम गट विकास अधिकारी आणि मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात रिक्त ठिकाणी ग्रामसेवकांची नियुक्ती करा, अशी मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी केली आहे.

बोदवड येथे गेले कित्येक महिन्यांनापासून गट विकास अधिकारी पद रिक्त असून शेजारच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी प्रभारी म्हणून बोदवड पंचायत समितीचा कार्यभार बघत आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील विकास कामे खोळंबली आहेत. तसेच बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक पद रिक्त असून एकाच ग्रामसेवकाकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने गाव कारभाऱ्यांना ग्रामविकासाचा गाडा हाकताना अडचणी येत आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बोदवड येथे कायम गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात रिक्त असलेल्या जागी ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची भेट घेऊन केली.

या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंचा सोबत ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजवावी लागते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन,जन्म मृत्य नोंद ठेवणे , कर वसुली करणे, ग्रामपंचायतचा वार्षिक विकास आराखडा तयार करणे,शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा, मासिक सभेमार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचवणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे. व पंचायत समिती पातळीवरील तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना गावात राबविणे, इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या ग्रामसेवक पार पाडत असतात.

एक अर्थाने ग्रामस्थ आणि शासनाला जोडणारा पुल म्हणून ग्रामसेवक कार्य करत असतात परंतु बोदवड तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीसाठी केवळ ७ आणि मुक्ताईनगर तालुक्यात ६१ ग्रामपंचायतीसाठी ३४ ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे .एका ग्रामसेवकाकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. त्यामुळे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाचा खेळखंडोबा झाला आहे, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना, सरपंचांना आठवडा आठवडा ग्रामसेवकांची वाट बघावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही. परिणामी विकास कामांमध्ये अडचणी येतात तसेच ग्रामस्थांना योजनांसाठी लागणारे कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे.

तालुक्यामधील सर्व विकास कामांची अंमलबजावणी करणे. विकास योजनांवर देखरेख ठेवणे. नियंत्रण करणे पंचायत समितीच्या योजना व निर्णयांबाबत कार्यवाही करण्याचे काम हे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करत असतात. पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजेच राज्य शासन यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतात. परंतु बोदवड पंचायत समितीमध्ये कायम स्वरूपी गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती नसून गेल्या अनेक दिवसा पासून प्रभारी अधिकारी हे बोदवड पंचायत समितीचा कार्यभार बघत आहेत त्यामुळे योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसून तालुक्यातील ग्रामविकासावर त्याचा परिणाम होत असून शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.

बोदवड तालुका हा कायम अवर्षणग्रस्त, दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. नेहमी अस्मानी संकटात असणारा हा तालुका आता तालुक्यात रिक्त असलेल्या गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या रिक्त जागांमुळे आता सुलतानी संकटातसुद्धा सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरी ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तालुक्याच्या ग्रामविकासाला गती यावी यासाठी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करून बोदवड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. निवदेन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस विजय चौधरी, एनगाव सरपंच विनोद कोळी, मुक्तळ येथील जितेंद्र पाटील, शाम सोनवणे, अजयसिंह पाटील, अमोल पाटील, विलास चौधरी आदी उपस्थित होते

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

June 28, 2022

जळगाव हादरलं : अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती ; आरोपीही अल्‍पवयीन !

February 23, 2022

सरकारविरोधी भूमिका असल्याने कुणी दशतवादी ठरत नाही ; न्यायालयाचा दोघांना जामीन

September 14, 2020

युवाचार्य प. पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सम्मान

January 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group