भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील यावल तालुक्यात अकलूज शिवारात असलेली पोदार इंटरनॅशनल स्कुलमधील विद्यार्थ्यांची शाळेची फिज भरण्यासाठी वारंवार पालकांना शाळेच्या संचालक मंडळाकडून फोनव्दारे सूचना देण्यात येत आहे. फिज न भरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही असे ही धमकविले जात आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी शाळेमध्ये पालक भेटण्यासाठी आले असता प्राचार्यांनी पालकांसोबत राडा करीत पालकांवर फी भरण्यासाठी प्राचार्य भडकले व पालकांना भर उन्हात गेटवर दोन तास उभे करून चर्चा केली.
सोमवार रोजी रेल्वे कर्मचारी (सरकारी कर्मचारी) यांनी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान, पोतदार इंटरनॅशनल स्कुल गाठले. आपल्या नोकरीवर जाण्याआधी वेळात – वेळ काढून पालक प्राचार्यांना भेटण्यासाठी शाळेच्या गेटजवळ आले असता शाळेच्या गेटवरील कर्मचाऱ्याने आलेल्या सर्व पालकांना बाहेर उन्हात थांबविले पालकांनी गेटवरील कर्मचाऱ्यास गेट उघडण्यास सांगितले. प्राचार्यांशी कर्मचाऱ्यांचे फोनव्दारे संपर्क साधला असता गेट उघडू नका अशा सूचना दिल्याने पालकांना दोन तास भर उन्हात उभे राहण्याची वेळ प्राचार्यांनी आणल्याची माहिती पालकांनी दिली. तब्बल तासानंतर प्राचार्यांनी पालकांची भेट घेतली तीही गेटमध्ये प्राचार्य व पालक गेटबाहेर उभे राहून चर्चा तासभर करण्यात आली. या दरम्यान शाब्दिक वाद ही झाले. पालकांच्या मागण्या प्राचार्य समजून घेण्यास तयार नव्हते. पालक शाळेची संपूर्ण फिज भरण्यास तयार असतांना त्यात कोरोनाच्या काळात काही सवलत मिळावी ही त्यांची मागणी होती. सदर प्रकरणातील एकही मागणी मंजूर करण्यास प्राचार्य कुठलीही परिस्थितीत तयार नव्हते.
प्राचार्य म्हणाले की, आम्हाला शाळेच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागतात. वाहन चालकांचे पगार द्यावे लागतात. वीज बिल भरावे लागते असे अनेक कारणे पालकांसमोर मांडले. सरकार कडून जे नियम येतील त्यांचे आम्ही कोटेखोरपणे पालन करीत आहोत. आम्हाला सरकारकडून कुठलीही ग्रँड मिळत नाही. शाळेत ५ ते १० पर्यतचे विद्यार्थानी ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांचे अँडमिशन आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची एका वर्षाची फिज ४२ ते ४५ हजार रुपये पर्यंतची आहे. तसेच शिक्षकांचा पगार असे अनेक समस्या आमच्या समोर आहेत. पालकांना सन २०१९-२०२० या वर्षासाठी फिज मध्ये ६ ईस्टालमेंट भरण्याची सवलत दिली आहे. शिक्षकांना इन्क्रीमेंट नाही. असे अनेक कारणे प्राचार्य विनायकुमार उपाध्याय यांनी दाखविल्याचा प्रकार आज रोजी घडला.
तसेच पालकांनी प्राचार्य यांना निवेदन ही दिले या निवेदनात जी के गुप्ता, यू एन पाटील, एस के सिंह, आर के शर्मा, सी डी टाडा, वाय एम बारापात्रे, ऐ के पासवान, विकास निराला, एन के सिंह, जी ऐ धुमाळ, आदींचे निवेदनात सह्या आहे.