धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथील सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष चंदन पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदान्द्वारे केली आहे.
पारोळा येथे एका दलित समाजातील २० वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चंदन पाटील यांनी निवेदन पाठवले असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी. तसेच या खटल्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.