धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वजाचे आज ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी फौजी चेतन पाटील, शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, किरण मराठे तसेच धिरेंद्र पुरभे, विनोद रोकडे,संतोष सोनवणे, कमलेश बोरसे, रविंद्र जाधव,सागर ठाकरे,गोपाल चौधरी,अरविंद चौधरी यांच्यासह शहरातील नागरीक बंधू भगिनी तसेच सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.