बडोदा (वृत्तसंस्था) भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात कृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.
टीम इंडियाचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या वडिलांचं शनिवारी निधन झालं आहे. हिमांशू पांड्या यांनी बडोद्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूमुळे कृणाल पांड्या बायो-बबलमधून बाहेर आला आहे. कृणाल पांड्या हा सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत आहे. तो बडोद्याच्या टीमचा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या ही स्पर्धा खेळत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-२० सीरिज खेळून हार्दिक पांड्या घरी परतला. हार्दिक आणि कृणाल यांच्या यशामध्ये हिमांशू पांड्या यांची भूमिका मोलाची राहिली. हिमांशू सुरतमध्ये छोटा कार फायनान्सचा व्यवसाय करायचे, पण मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी बडोद्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. बडोद्यामध्ये सुरतपेक्षा क्रिकेटची चांगली सुविधा आहे, त्यामुळे हिमांशू यांनी आपला व्यवसायही बंद केला. मुलांना क्रिकेटपटू बनवण्याच्या निर्णयावर काही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले होते, पण आम्ही विश्वास ठेवला, असं हिमांशू पांड्या एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही. आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे.