TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना लशीचे दोन डोस घेणं बंधनकारक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होत आहे. अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मेहनतीचे हे यश आहे, त्यामुळे कोरोना लस घेताना सर्वांनी संयम बाळगावे’ असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. ‘दोन टप्यात कोरोना लसीकरण होणार असून “कोरोना लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोरोनावर मात करण्यासाठी अखेर भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोना लसीबद्दल सविस्तर माहिती दिली. ‘मी सगळ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की कोरोना लसीचे २ डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर आपल्या शरीरात कोविड १९ विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे सुरू होईल’, असं मोदी यांनी सांगितले. तसंच, ‘लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी जणांना लस देण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 कोटी जणांना लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये वृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती आदींचा समावेश असेल लसीकरणाचे हे प्रमाण ऐतिहासिक असेल, असंही मोदी म्हणाले. ‘ज्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, त्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे कोरोना लशीचे पहिले हक्कदार असणार आहे. मग शासकीय डॉक्टर असतील किंवा खासगी असतील, त्या सर्वांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस, कर्मचारी, जवानांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यांची संख्या तीन कोटी इतकी आहे. यां कोरोना लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे, अशी घोषणाही मोदींनी केली. ‘कोरोना लसीकरण आता सुरू झाले आहे. संपूर्ण देशातील लोकांचं मी अभिनंदन करतो. कोरोनावर लस तयार करण्यासाठी डॉक्टरांनी जीवाचे रान केले. त्यांनी सण पाहिले नाही, ना उत्सव पाहिले नाही. लस तयार करण्यासाठी अनेक वर्षांचा कालवधी लागत असतो. पण, अवघ्या काही महिन्यात डॉक्टरांनी करून दाखवले आहे. आता मेड इन इंडिया असलेल्या दोन लशी उपलब्ध झाल्या आहे, असे गौरवद्गार मोदींनी काढले.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

कोव्हिन डिजीटल प्लॅटफॉर्मवर (cowin app) लस घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. या अॅपमधून पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस कधी देणार आहे, याची माहिती दिली जाईल. कोरोना लसीचे दोन डोस घेणे गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लशीचा डोस घेण्यामध्ये एक महिन्याचा वेळ लागतो. लस लागल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे वागू नका, मास्क वापरणे सोडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडू नका. लस घेतल्यानंतर सुद्धा हे नियम कायम राहणार आहे. लहान मुलांना जी पोलिओचे डोस दिले जातात ते भारतातच तयार होती. भारताची कोरोना लस ही निर्णायक विजय मिळवून देणार आहे. ही लस आपल्या आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास वाढवण्यात मदत करणार आहे. संकट कितीही मोठे असले तरी आत्मविश्वास सोडला नाही. त्यामुळे धैर्याने लढा देऊया, असंही मोदी म्हणाले.

डॉक्टर, नर्स, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांनी अनेक दिवस आपल्या मुला-बाळांना नातेवाईकांना पाहिलं नाही. त्यातील काही सहकारी तर घरी परतू शकले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पहिली लस म्हणजे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे.” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

जळगावात अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडी करून रोकडसह चांदीचे दागिने लांबविले ; रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 24, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३ !

August 29, 2023

निफाडला पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने पकडला १० लाखांचा गांजा !

August 25, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १९ मे २०२३ !

May 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group