मुंबई (वृत्तसंस्था) गोवावाला कम्पाउंड मनी लाँड्र्रिंग प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (dawood ibrahim) बहिण हसीना पारकरचा (hasina parkar) बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल (salim patel) हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा धक्कादायक जबाब राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी ईडीला (ed) दिला आहे.
मलिक यांच्याविरोधात ED ने दाखल केलेल्या आरोपत्रात मुंबईतील गोवावाला कंपाऊड संदर्भात जाब जबाब सुरु असताना त्यांनी ही माहिती सांगितली आहे. तसंच त्यांनी सलीम पटेलबाबत अनेक खुलासे केले आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा होता, तसंच हसीना पारकरने केलेल्या व्यवहारांची त्याला माहिती असायची, गोवावाला कंपाउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीमला मलिक यांच्याकडून १५ लाख मिळले होते. नवाब मलिक यांचा भाऊ अस्लम मलिक यांचीही गोवावाला कंपाउंडच्या संबंधित व्यवहारात सहभाग असल्याचे चौकशीतून समोर आलं आहे.
तसंच, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेलला या आपण २००२ पासून ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. राष्ट्रवादीचे त्यावेळचे मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करायचा, गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी आपणास माहिती नव्हत्या, असही मलिक म्हणाले आहेत.