जामनेर (प्रतिनिधी) तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाहीतर तूला मारुन टाकीन, या सतत कृत्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. याप्रकरणी अर्जुन रामा जाधव या व्यक्तीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील विवाहितेला तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाहीतर तूला मारुन टाकीन अशी धमकी अर्जुन रामा जाधव याने दिली. एवढेच नव्हे तर हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन शिवीगाळ केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन रामा जाधव, चरणदास रामा जाधव, राजू रामा जाधव, अनिल अर्जुन जाधवसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि दिलीप पाटील हे करीत आहेत.