TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in जळगाव, मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना झाला नाही… तो आता बंडखोर शिंदे गटात सामील झाला आहे, हा आमदार थोड्याच दिवसात भाजपात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊन राज्यातील असंविधानिक सरकार कोसळेल.पन्नास खोके एकदम ओक्के” यात काय दडलंय हे सारी जनता जाणून आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता गद्दारांना माफी करणारच नाही.” या मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा….. असे सांगून ५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही. पुढील काळात भैय्यासाहेब आणि नाथाभाऊंवर प्रेम करणाऱ्या जनसामान्यांनी नाथाभाऊप्रमाणेच करारी बाणा असलेल्या रोहिणीताई खडसेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावांमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या आठव्या दिवशी शेलवड ता. बोदवड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सध्या देशात जे सुरु आहे, ते लोकशाहीला अतिशय घातक आहे. लोकशाहीची पायमल्ली करून आता जळी -स्थळी -काष्टी -पाषाणी, अक्षरशः चंद्रावर सुद्धा भाजपाचेच सरकार असावे यासाठी अघोरी प्रयत्न सुरु आहेत. ईडी, सीबीआय, आयटी आदी संस्था हाताशी धरून मोदी सरकारने विरोधक संपवण्याचे काम चालवले आहे. ज्या किरीट सोमय्याने याआधी प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांचेवर आरोप केले, ही मंडळी शरण जाताच तो आता गुपचूप बसलाय हे समजण्याइतपत जनता खुळी नाही. महागाई, बेरोजगारी याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.असा आरोप त्यांनी केला.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

यावेळी सरकारमध्ये शिंदे गटासह भाजपा मध्ये आमदारंमध्ये प्रचंड नाराजी आहे. मलाईचे खाते मिळाले नाही म्हणून मंत्री नाराज, तर मंत्री पद मिळाले नाही म्हणून आमदार नाराज… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोर्टामध्ये अपात्रतेची टांगती तलवार १६ सदस्यांवर आहे… निकाल लागताच राज्यातील सरकार कोसळणारच असा दावा, मिटकरी यांनी केला. याप्रसंगी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे यांच्या दौऱ्यावरही टीका केली.

भारत देश कृषी प्रधान असून शेती करणारे सगळेच लोक हिंदू आहेत. हाच हिंदू समाज धोक्यात आला आहे. बियाणे,खते आणि फवारणीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेत मालाला भाव नाही… अनेक जण कर्जबाजारी झाल्याने जीवनयात्रा संपवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाचा सत्तेसाठी वापर करणार्यांना हे हिंदुत्व दिसत नाही का?? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण भाषणात शेर शायरी करत त्यांनी तुफान फटके बाजी करून सभा जिंकली.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी लढवत असतांना सौ रोहिणीताई खडसें अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाल्यात. त्यांचा झालेला पराभव एका दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडला. कारण त्या पराभूत झाल्या नसत्या तर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसता. त्यांच्या रूपाने रा. कॉ. नेत्या सुप्रियाताई सुळे यांचे प्रमाणेच कणखर, लढवय्ये, आक्रमक आणि जनसेवेसाठी तत्पर असं नेतृत्व राष्ट्रवादीला मिळालं आहे. ज्या नाथाभाऊनी पक्षवाढीसाठी जीवाचे रान केले, त्याच पक्षाने त्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले, अजूनही एकाच प्रकरणाची पुन्हा पुन्हा चौकशी लावून त्यांची छळवणूक सुरु आहे.

आता पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी नाथाभाऊंवर आहे. आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकित हे सिद्ध होईल. प्रसंगी कोणत्याही निवडणुका नसताना रोहिणीताईनी सुरु केलेल्या जनसंवाद यात्रेबद्दल अभिनंदन करून ही यात्रेची संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.याआधी जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जि प सदस्य रामदास पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ पाटील, VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास भाऊ पाटील, शेलवड नगरीचे सरपंच समाधान भाऊ बोदडे, उपसरपंच रामदास भाऊ माळी, राजाराम भाऊ जवरे, रामभाऊ म्हस्के, अशोक सोन्नी, राजू पाटील, ईश्वर वाणी, कडू माळी , समाधान राऊत, वामन म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

बापरे...नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली तरुणांना २८ लाखांचा गंडा ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये आढळला 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह ; 4 दिवसांपासून होती बेपत्ता !

April 8, 2022

मुलबाळ होण्यासाठी खात्रीलायक आयुर्वेदीक औषध असल्याची मारली थाप ; एकाची साडेसहा लाखांत फसवणूक !

September 15, 2023

एम. टी. एस. परीक्षेत अथर्व चौधरीचे यश, धुळे केंद्रात द्वितीय क्रमांक

December 12, 2020

जळगाव जिल्हयात १५ दिवस कठोर निर्बंध युक्त संचारबंदी लावावी : डॉ. नि. तु. पाटील

March 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group