मुंबई (वृत्तसंस्था) खरं म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून रहायला नको होतं. राजीनामा दिला खरं पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं.
खरं म्हणजे पहिल्याच दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. “राजीनामा तूर्तास आहे की पूर्तास हे आम्हाला माहिती नाही, सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. ज्या प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न झाला हे देखील उघड झालं आहे. बूंद से गयी वो हौदो से नही आती…त्यामुळे राजीनामा तूर्तास आहे की कसा हे त्यांनाच ठरवू द्या. जो पर्यंत पूजाला अंतिम न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपा याचा पाठपुरावा करेल. ” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला २० दिवस होऊन गेले तरी देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. या प्रकरणात सर्व पुरावे असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्या पोलिसांवर कारवाई झालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी हा विषया लावून धरला त्यामुळे राजीनामा दिला गेला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल म्हणून हे झाले. राजीनामा झाला, आता एफआयआर करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.