धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगरसेवक ध.न.पा. ललित येवले व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणगाव शहरात भव्य ह्रदय रोग व स्त्री रोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. वाणी मंगल कार्यालय, वाणी गल्ली येथे आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.
शिबिराच्या उद्घाटन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. मिलिंद डहाळे, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ डाॅ. व्ही. आर. तिवारी, जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे, मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष मनिष लाड व जळगाव येथील सुप्रसिद्ध डाॅ. संदीप भारूडे (ह्रदय रोग अतिविशेष तज्ञ) व डाॅ. प्रिती संदीप भारूडे (स्त्री रोग तज्ञ, वंधत्व व लॅप्रोस्कोपिक स्पेशालिस्ट) यांच्या उपस्थितीत शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी वाणी मंगल कार्यालय, वाणी गल्ली, धरणगाव येथे संपन्न झाला. याप्रसंगी डाॅ. नरेंद्र पाटील (पॅथाॅलाॅजीस्ट) यांनी अल्प दरात रक्ताच्या तपासण्या केल्या. भाजपाचे जेष्ठ नेते शिरीष अप्पा बयस, सुभाष अण्णा, पी.सी.आबा पाटील व संजय महाजन, तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, गटनेते कैलास माळी, नगरसेवक उपस्थित होते. तसेच भा.ज.पा शहर अध्यक्ष दिलीप महाजन व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, केमिस्ट असोसिएशन डॅा .असोसिएशन व लाडशाखिय वाणी समाज व मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले. सुत्रसंचलन प्रशांत मुसळे, गुलाब मराठे व आभार डाॅ. सुचित जैन यांनी केले.