जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिकेवर आज (सोमवार) सुप्रीम कोर्टाने दोघं पक्षांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर कोर्टाने पुढील सुनवाईची तारीख १८ नोव्हेंबर दिली आहे. आता १८ तारखेला कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या संदर्भात अधिक असे की, सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज निर्णय होणार होता. परंतू आज न्यायालयाने दोघं पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर देवकर यांच्या वकिलांनी एका आठवड्यानंतर सुनवाई घेण्याची विनंती केली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी २१ तारखेला मतदान असल्याचे सांगत लवकर सुनवाई घेण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने पुढील सुनवाई १८ तारखेला ठेवली आहे. या वृत्ताला अॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी दुजोरा दिला आहे.
घरकुल प्रकरणी झालेल्या शिक्षेवर आरोपींनी स्थगिती मिळवली होती. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी इतर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीने या निवडणुकीत आधीच बहुमत मिळवले आहे.